Sunday, 14 June 2020

छिछोरा

खरं तर माझ्या अनियमीत बेशिस्त लिखाणाला फाटा देऊन मी आज  दुसऱ्या विषयावर  लिहायला बसलो होतो. अर्धवट लिहुन झालेलं असतानाच सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली म्हणुन  बायकोने टीव्ही लावला. खरं तर टीव्ही सुरु होईपर्यंत आणि अजुनही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. एका क्षणासाठी मी बायकोला म्हणालो कि सुशांत सिंग (लेजेंड ऑफ भगत सिंग वाला ) असेल कारण सुशांत सिंग राजपूत हा करिअर च्या बाबतीत खुप पुढे गेला होता, तो आत्महत्या करेल असं वाटतंच नाही.
आताच तर तु आवडायला लागला होतास यार, इतक्या लवकर एक्झिट. आता लॉक डाऊन मध्ये तुझा बोमकेश बक्षी  बघितला होता. त्यात पण छान काम केलं होतं. तो मुव्ही थिएटरला नं बघितल्याची एक रुखरुख राहिली होती. पण त्यापेक्षा मोठी रुखरुख देऊन गेला यार.
असं काय झालं असेल तुझ्या आयुष्यात ज्यामुळे तु आत्महत्या केलीस, डोकं भणभणतंय. खरं तर तू माझ्या अतिशय आवडत्या हिरोंमध्ये नव्हतास, पण आपलेपणा वाटावा असा तुझा पडद्यावरचा वावर होता.
काय कारण असू शकेल ते आपल्याला कदाचित काही दिवसांनी कळेल किंवा कळणार नाहीच. पण एक अतिशय गुणी आणि खराखुरा बॉय नेक्स्ट डोअर म्हणु शकु असा अभिनेता आज गेला.
अतिशय वाईट वाटतंय, रडू येतंय.
काय पो चे हा चित्रपट बघितला त्याआधी सिरीयल मध्ये काम करणारा एक मुलगा ह्यात आहे हे माहित होतं, त्याने छान काम केलं होतच त्यात पण हा माणुस इतका पुढे जाईल हे कधी वाटलं नाही. कारण सिरिअल्स मधून काम करणारे चित्रपटांमध्ये फार पुढे गेल्याची उदाहरणं कमीच. पण ह्याने कमाल केली.
एम.एस.धोनी  हा त्याचा बेस्ट मुव्ही. काय काम केलं होतं त्याने.
पण त्यापेक्षा जास्त आवडलेला आणि ऑलरेडी १०-१५ वेळा बघितलेला छिछोरे हा चित्रपट माझ्या कायम लक्षात राहील. माझी ३ वर्षाची लेक तो मुव्ही प्रत्येक वेळी आवडीने बघते आणि त्यातली गाणी म्हणते. त्यातले छोटे छोटे सीन्स तिच्या लक्षात आहेत.
करिअर चा किंबहुना आयुष्यातला शेवटचा चित्रपट आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करणारा आणि जगण्याचं बळ देणारा असावा, आणि त्याच अभिनेत्याने आत्महत्या करावी ह्याला काय म्हणावं.
घरवालो का तो सोचना था यार.
सुशांत जिथे असशील तिथुन परत ये, अजुन खुप काही करायचं होतं मित्रा. 

No comments:

Post a Comment