प्रस्तुत लेख हा फक्त स्वानुभवावर आधारित नसून परिसर अभ्यासावर सुद्धा बेतलेला आहे.तसेच ह्या विषयावर मोठ मोठ्या लोकांनी लिहून ठेवलंय मी फार काही वेगळं लिहू शकणार नाही पण आपली उगाच एक खाज....
प्रपंच आणि परमार्थ
परमार्थाचा मार्ग हा प्रपंचातून जातो असं लहानपणी वाचलेलं आठवतं.त्या वेळी ते फार कळायचं नाही आणि आताही सगळंच कळतंय असं नाही. पण लग्नाला ४-५ वर्ष झालीत आणि थोडं थोडं कळायला लागलं असं म्हणता येईल.
आपल्या भारतीय हिंदू संस्कृती मध्ये लग्नाला महत्व दिले गेले . कारण लग्न केल्याशिवाय काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे कसं कळणार. आणि ते तसं कळलं नाही तर माणूस हतबल कसा होणार.
शाळेत मराठी मध्ये गो.ग. आगरकरांचा एक धडा होता ' आमचे ग्रहण अजून सुटले नाही'. त्यात त्यांनी म्हटलंय की माणसाच्या हाताबाहेर गोष्टी गेल्या की माणूस देवा धर्माच्या मागे लागतो. खरं तर त्यांनी अंधश्रद्धा म्हटलं होते. पण आपण सोयीसाठी देव म्हणूया.
लग्नाच्या आधी कसं तुम्हाला कोणाची बाजू घेण्याची गरज नसते. आई आणि फक्त आई. लग्न झालं की आपल्या बायकोच्या रूपाने आईचा सगळ्यात मोठा शत्रू आपल्या घरात प्रवेश करतो (आणि हे प्रेम विवाह आणि घरच्यांनी ठरवून केलेलं लग्न ह्या दोन्हीत सारखंच आहे). इथूनच आपल्या हतबलतेला सुरुवात होते. दोन्ही पार्ट्या एकत्र खुश होऊ शकत नाही, आणि कोणा एकाला खुश ठेवलं तर लगेच बायकोचा बैल किंवा आईचं कोकरू सारख्या सुया टोचून घ्याव्या लागतात. बरं कोणाला एकीला तिच्या मनाप्रमाणे वागू दिलं तर ते दुसरीच्या मनाविरुद्ध(च) असणार.
खुप सारी छोटी छोटी उदाहरणे देऊन फुटेज खाण्यात काही अर्थ इथे कोणा एकाची चुक आहे किंवा कोणी एक कायम बरोबर आहे असं नाही, पण हा मुळात इगो इशू असतो.
(असले इगो इशूज सासरा-जावई, सासु-जावई, सासरा-सुन ह्या जोड्यांमध्ये अपवादाने दिसतात. जास्त स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी)
असो, बहूत बडी मश्किल है आणि करे तो क्या करे. असं काही झालं कि माणसाला कळतं कि ह्या जगात आपल्या कुवतीच्या (लायकीच्या) बाहेर काही गोष्टी आहेत आणि मग नकळत तो द्वैताकडून अद्वैताकडे ओढला जातो.कदाचित म्हणूनच तुकाराम महाराज हे लवकर संत पदाला पोचले किंवा विठ्ठलमय झाले आणि त्यांचे मोठे बधू मात्र देवाच्या शोधात फिरत राहिले. गृहस्थाश्रम हा संन्यासाश्रमाकडे जाण्याचा राजमार्ग असावा, उगाच का जवळपास सारेच संत हे संसारी होते.
तात्पर्य : पु.ल. म्हणतात तसं 'ह्या जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं ह्या इतकाच कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न पण विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी ह्या प्रश्नाच्या मागे लागू नये, कारण हे सारं काय आहे आणि कशासाठी आहे ह्याचा उत्तर कुणालाही सापडलं नाही, (आणि कदाचित सापडणार हि नाही) आहे हे असं आहे, आपल्याला होऊन ह्यात अर्थ निर्माण करायचा आहे."
Disclaimer : १) मी हे लिहितोय म्हणून उगाच माझ्या घरात फार मोठा इशू आहे का? असं विचारू नका.किंवा तुम्ही फार आदर्श नाते बघताय/ जगताय असाही विचार करून जगाला (आणि स्वतःलाही) फसवु नका. (अपवाद असू शकतात, कारण अपवादानेच नियम सिद्ध होतात) थोड्या बहोत फरकाने सगळीकडे हीच परिस्थिती आहे. २) मुलींची वेगळी बाजु असु शकते, पण ती मांडायला मी बांधील नाही. मुलींनी स्वतःची बाजु स्वतः मांडावी. आहे."
श.कु.
(शशांक कुळकर्णी, हे माझ्या आईने माझ्यासाठी ठेवलेलं नाव, जे व्यवहारात आलं नाही. पण मला आवडतं, म्हणून श.कु.)